◆ तीन ट्रॅक्टरसह १९ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त
◆ सहा चालक-मालकांवर गुन्हा दाखल
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तुमसर : अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा मांडवी येथे अवैधरेित्या रेतीची चोरीची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन ट्रॅक्टर, तीन ट्रॉली, रेती आणि तीन मोबाईल असा एकूण १९ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित सहा चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६.३१ ते ७.१८ वाजтаच्या दरम्यान मौजा मांडवी, ता. तुमसर येथे अवैधरेित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन ट्रॅक्टर व त्यांना जोडलेल्या तीन ट्रॉली ताब्यात घेतल्या.
या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीची अंदाजे किंमत १९ लाख २५ हजार रुपये, तीन ब्रास रेतीची किंमत १८ हजार रुपये, तर व्हिवो कंपनीच्या तीन अँड्रॉइड मोबाईलची किंमत ३० हजार रुपये असा एकूण १९ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी ट्रॅक्टर क्रमांक MH36AR3967 चा चालक तरुण धनपाल मण्डलवार, रा. मांगली, व मालक वामन झिंगरची नेवारे, रा. मांगली; ट्रॅक्टर क्रमांक MH34BF9702 चा चालक दुर्गेश जयपाल रहांगडाले, रा. सोनेगाव, व मालक टेकचंद शरणागत, रा. मुरली; तसेच ट्रॅक्टर क्रमांक MH36AL5138 चा चालक नितेश परमानंद अडमाचे, रा. मोहगाव खदान, व मालक जीवन गोविंद डहाळे, रा. ककापूर, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ३७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) व ४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, पोलीस हवालदार भोंडेकर, पोलीस सिपाई सर्वे व पोलीस सिपाई आस्थले यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.