तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन

मोरेश्वर बिसने/भंडारा पत्रिका

तुमसर : तुमसर तालुक्यात यंदा पावसाचे असमान प्रमाण, पिकांचे नुकसान आणि निर्माण झालेल्या कृषी संकटाच्या पार्श्वभूमीवर तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.

निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून आवश्यक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, आवश्यक सवलती तसेच इतर शासकीय मदत मिळावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष अमर रंगारे, प्रमोद तितीरमारे, बब्बूभाऊ ठाकूर, तुमसर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद कटरे, कान्हाभाऊ बावनकर, शैलेश पडोळे, कुसुमताई कांबळे, ममता बिसेन, निशा गणवीर, माधुरी धुर्वे, अरविंद ठाकरे, विजयजी रतिराम चौधरी, विजयजी चौधरी, प्रफुल बिसेन, दिनेश भवसागर, तारेन्द्र डिंकवार, शिवभाऊ बोरकर, रामप्रसाद काहलकर, विनोद कोकोडे, नानाभाऊ ठवकर, संजय गजाम, दिलीप लांजेवार, रविभाऊ भगत, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे निवेदन देत शासनाने तुमसर तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *