भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील तुमसर-बापेरा राज्य महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाºया या महत्त्वाच्या मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºया वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या राज्य मार्गावरून दररोज प्रवासी बस, दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. याच मार्गाने अनेक विद्यार्थी सायकलवरून शाळेत ये-जा करतात. मात्र उखडलेल्या डांबरीकरणामुळे, खड्डयांमुळे आणि वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाºया धुळीमुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची ही अवस्था कायम राहिल्यास अपघात होऊन जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा सुरू असताना ही अनेक ठिकाणी रस्त्या वरील डांबरीकरण उखडलेले असून खड्डे स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºया वाहनचालकांना अधिक सावधगिरीने वाहन चालवावे लागत असल्याचे चित्र आहे.
तुमसर-बापेरा राज्य महामार्गाची दुरवस्था उखडलेल्या डांबरीकरणामुळे धुळीचे लोट