भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत गोरेगाव तालुक्यातील मुरदोली गावात शेतातील विहिरीत वयस्क वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. ही घटना ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मुरदोली येथील शेतकरी रोशनलाल कटरे हे आपल्या शेतातील सर्व्हे क्र. १८१ मधील पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील विहिरीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी डोकावून पाहिले असता विहिरीच्या पाण्यात एका मोठ्या वाघाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाºयांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वन अधिकाºयांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला. मात्र रात्र झाल्यामुळे आणि नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथॉरिटीच्या नियमानुसार मृत वाघाला आज सकाळी विहिरीतून बाहेर काढून पुढील प्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार पंचनामा, शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या गेल्या. प्राथमिक माहितीनुसार वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तो पाणी पिण्यासाठी आला असताना चुकून विहिरीत पडला की, त्याला दुसºया कारणाने मारण्यात आले, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वनविभागाने सांगितले. या घटनेमुळे मुरदोली आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा वाघांचा अधिवास असल्याने शेताशेजारी अनेकदा वन्यजीव दिसून येतात. नागरिकांनी मागणी केली आहे की, वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी परिसरातील उघड्या विहिरींवर तातडीने संरक्षण जाळ्या बसवण्यात याव्यात. वनविभागाने संपूर्ण परिसरात गस्त वाढवली असून पुढील तपास सुरू आहे. ठठळफ “घटनेची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र रात्र असल्यामुळे च्या निर्णयानुसार मृत वाघाला आज सकाळी विहिरीतून बाहेर काढून नियमानुसार पंचनामा, शवविच्छेदन व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आले. तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.” असे प्रीतमसिंग कोडावे, उपसंचालक, गोंदिया यांनी सांगितले. ठळउअ ठठळफ