नागपूर जिल्ह्यात महावितरणचा दणका, अवघ्या ९ दिवसांत ४६० वीजचोºया उघड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यात विजेचा अपव्यय रोखून वीज हानी नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रामाणिक ग्राहकांना अखंडित व उच्च दर्जाचा वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १ ते ९ सप्टेंबर या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागांत धडक कारवाई करत तब्बल ४६० वीजचोºयांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. महावितरणच्या स्थानिक अभियंत्यांनी आणि तांत्रिक कर्मचाºयांनी राबवलेल्या या कारवाईमुळे अवैध मार्गाने वीज वापरणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या या धडक तपासणी मोहिमेअंतर्गत कर्मचाºयांनी शहरी, ग्रामीण, औद्योगिक वसाहती तसेच व्यावसायिक केंद्रांमधील वीज मीटर आणि जोडण्यांची अत्यंत सखोल पाहणी केली. या कारवाईत नागपूर जिल्ह्यातील शहर मंडलात २७० तर नागपूर ग्रामीण मंडलात १९० अशा एकूण ४६० वीजचोºया उघडकीस आल्या.

यामध्ये नागपूर शहर मंडलांतर्गत बुटीबोरी विभागात ७२, महाल विभागात ६५, सिव्हिल लाईन्स विभागात ५३, काँग्रेसनगर विभागात ४८ आणि गांधीबाग विभागात ३२ प्रकरणांचा समावेश आहे. तसेच नागपूर ग्रामीण मंडलांतर्गत मौदा विभागात ६०, उमरेड विभागात ५८, सावनेर विभागात ४६ आणि काटोल विभागात २६ ठिकाणी वीजचोरी पकडण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान मुख्य विद्युत वाहिनीवर थेट हुक टाकून वीज घेणे, मीटर बायपास करणे, सीलशी छेडछाड करणे, मीटर संथ करणे किंवा डिजिटल डिस्प्ले बायपास करणे यांसारखे बेकायदेशीर प्रकार निष्पन्न झाले आहेत. या मोहिमेत घरगुती वापरासोबतच काही व्यावसायिक संस्था आणि लहान उद्योगांमधील गैरप्रकारही समोर आले आहेत. उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये चोरीच्या विजेचे अचूक मूल्यमापन करून दंडात्मक रकमेची बिले (अ२२ी२२ेील्ल३) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोषी आढळलेल्या ग्राहकांवर भारतीय वीज कायदा, २००३ च्या कलम १३५ आणि १३८ अन्वये कडक फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जात आहे.

दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाºयांवर थेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात येत असून अनेक ठिकाणी तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजचोरीमुळे केवळ महावितरणची आर्थिक हानी होत नसून, रोहित्यांवर अतिरिक्त ताण येऊन ते जळणे, तांत्रिक बिघाड होणे आणि नियमित बिल भरणाºया ग्राहकांना कमी दाबाच्या  विजेचा त्रास सहन करावा लागणे असे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्रामाणिक ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि दर्जेदार वीज सेवेसाठी ही शोधमोहीम आगामी काळात अधिक वेगाने राबवली जाईल, असा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब न करता अधिकृत वीज जोडणी घेऊनच सुरक्षित वीज वापरावी, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे. तसेच परिसरात वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी महावितरणला सहकार्य करून माहिती द्यावी; माहिती देणाºयाचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, अशी ग्वाहीही प्रशासनाने दिली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *