नीट-टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ मोहाडीत तरूणांचा एल्गार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : देशभरातील नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेतील भीषण पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज २१ जुलै रोजी मोहाडी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.राष्टÑवादी श.प.पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी हातामध्ये भारतीय संविधानाची प्रत घेऊन संविधानाची महत्ता सांगत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाºया बेजबाबदार सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप दिवस-रात्र अभ्यास करून परीक्षांची तयारी करणाºया प्रामाणिक विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे भवितव्य या पेपरफुटीमुळे धोक्यात आले आहे.

भारताचे भविष्य होऊ पाहणाºया या तरुण पिढीच्या स्वप्नांचा चुराडा करणाºया या सरकारविरोधात उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा देत, स्थानिक पातळीवरही हा लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संदर्भात पंतप्रधान यांच्या नावे असलेले निवेदन मोहाडीच्या तहसीलदारांमार्फत सादर करण्यात आले. सर्वपक्षीय आणि विविध संघटनांची मोठी उपस्थिती या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आणि अकरऋ (आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष हंसराज आगाशे, माजी सभापती देवा निखारे, पंचायत समिती सदस्य कैलास झंझ- ाड, शिवसेना (उबाठा) चे ओमप्रकाश ठोंबरे व रूपेश झंझाड, विजय शहारे, अनिल न्यायखोर, शाम साठवने, गौरव नवरखेले, रवींद्र बाभरे, सेवक चिंधालोरे, बालचंद बोंदरे, महेश निमजे, रोहित पडोळे, जगन गोमासे, बलवंत पंचबुद्धे, राजेश निंबार्ते, एन. टी. तितिरमारे, बबलू मलेवार, मनोहर बुराडे, विजय बोदरे, विनोद साठवने, विलास वाडीभस्मे, राजन बोंदरे, कामरेड बावने, किशोर भैरम, आदर्श बडवाईक, समृद्ध भैरम, बबलू सय्यद, श्रेयस बन्साड, प्रवीण झंझाड, लिल्हारे, रूपचंद बांते, अरुण मुटकुरे, विनोद पिंगरे, सलीम शेख, पुरुषोत्तम पातरे, रवी थोटे, का. बबलू नानापूर, के. बी. चौरागडे, गजानन समरीत, निखिल खोब्रागडे, श्रीकांत भजे, सचिन राखडे, देवानंद साहूसाखरे, अरुण समरीत, हिरालाल समरीत, अरुण सेलोकर, किरण झंझाड, अजबराव गराडे, अफरोज पठाण, सुरेंद्र बारई, अंकुश दमाहे, कैलास भगत, महेश कळंबे, मधुकर पटले, स्नेहल कळंबे, कपिल पुंडे, राधेश्याम बांडेबुचे, सेवकराम सार्वे, गुरुप्रसाद सेलोकर, विनायक मारवाडे यांच्यासह परिसरातील शेकडो आबालवृद्ध, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *