भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : ऐन खरीप हंगामात मोह- ाडी तालुक्यातील पालडोंगरी, टांगा, आंधळगाव परिसरातील १५-२० शेतकºयांवर महावितरण विभागाने अनधिकृत वीज वापरावर कारवाई करत शेतीपंपांचा वीजपुरवठा व रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकºयांची पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. पºहे वाळल्याने अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून महावितरणच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईविरोधात शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत महावितरणने नियमांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक होते. शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
खरीप हंगामात धान पिकाला नियमित पाण्याची आवश्यकता असते. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतीपंप बंद पडले असून पिकांना वेळेवर पाणी देता आले नाही. परिणामी अनेक शेतांतील धान पीक वाळले आहे. मागील पंधरा दिवसांपासून परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने धानासह इतर खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा बंद झाल्याने शेतीपंप बंद पडले आणि शेतकºयांना पिकांना पाणी देता आले नाही. मात्र अनेक शेतांतील पºहे वाळले असून शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
एवढे निश्चित! परिसरातील अनेक शेतकºयांना शासनाच्या सौर कृषी पंप योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी काही शेतकºयांनी वीजतारांवर आकडे टाकून पंप सुरू केले होते. यानंतर महावितरण विभागाने कारवाई करत वीजपुरवठा खंडित केला. मात्र, खरीप हंगामाच्या मध्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळेशेतकरी अडचणीत सापडल्याची भावना लोकप्रतिनिधी व्यक्त केली आहे. शेतकºयांचे म्हणणे आहे की, वेळेत सौर कृषी पंप उपलब्ध झाले असते तर त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला नसता. नैसर्गिक संकट आणि वीजपुरवठा बंद या दुहेरी संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून शासनाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.