पवनी शहरात चिल्लर व सुट्या पैशांचा तुटवडा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पवनी शहरातील बाजा- रपेठेत सध्या चिल्लर पैसे व सुट्या पैशांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा फटका व्यापारी, दुकानदार तसेच ग्राहकांना बसत आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन शहरातील व्यापारी व नागरिकांसाठी आवश्यक प्रमाणात सुटे पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी व्यापारी असोसिएशन पवनी, जिल्हा भंडारा यांच्या वतीने स्थानिक बँक शाखा व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष देवराज बावनकर, उपाध्यक्ष दत्तू मुनरतीवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पवनी शहरातील बाजारपेठेत सध्या १, २, ५, १० व २० रुपये मूल्यांच्या नोटा तसेच नाण्यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना व्यापारी व ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषत: किरकोळ खरेदी- विक्रीच्या व्यवहारांमध्ये सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याने व्यवहार खोळंबत असून, ग्राहक व व्यापाºयांमध्ये गैरसोय निर्माण होत आहे. दैनंदिन बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत राहण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार चिल्लर व सुटे पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली आहे. बँकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. चिल्लर पैशांच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली समस्या दूर करून पवनी शहरातील व्यापारी व नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली आहे. निवेदन देताना व्यापारी असोसिएशन पवनीचे विजय पाटील, विजय ब्राह्मणकर, मच्छिंद्र हटवार, अरविंद तांडेकर, किशोर भांडारकर,पंकज सावरबांधे, अरविंद काकडे आदी व्यापारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Wie op zoek is naar een betrouwbaar online casino wil vaak eerst de voorwaarden en het spelaanbod vergelijken voordat er een account wordt aangemaakt. Nederlandse spelers letten daarbij op zaken als de beschikbaarheid van populaire gokkasten, tafelspellen en live casino-opties, evenals op de snelheid van uitbetalingen en de kwaliteit van de klantenservice. Een overzicht van actuele promoties kan handig zijn, zoals bijvoorbeeld de NyxBets Bonussen, waarmee nieuwe leden hun eerste storting kunnen verdubbelen of gratis spins op geselecteerde slots ontvangen. Daarnaast is het verstandig om te controleren of de aanbieder beschikt over een geldige vergunning van de Kansspelautoriteit, zodat je zeker weet dat persoonlijke gegevens veilig worden verwerkt en dat eerlijk spel wordt gegarandeerd door onafhankelijke testinstanties.