पुतण्या जावयाचा सासऱ्यावर जिवघेणा चाकू हल्ला

मडेघाट येथील घटना; आरोपी जावई पसार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

लाखांदूर : मृत पत्नीच्या वाट्याला येणारी शेत जमीन मला द्यावी या मागणीवरून पुतण्या जावयाने सासऱ्यावर जिवघेणा चाकू हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या ६.३० वाजताच्या सुमारास मडेघाट येथे घडली. दीपचंद केवलराम ढोरे (४५) रा.मडेघाट असे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. राहुल राऊत (३५) रा. खालापूर (ह. मु. खैर्णा) असे चाकू हल्ला करणाऱ्या जावयाचे नाव आहे.

सविस्तर असे की, घटनेतील जखमी दीपचंद ढोरे हे तिघे भाऊ व एक बहीण होते. त्यांना मडेघाट येथे वडीलोपार्जित ५ एकर शेत जमीन आहे. त्यांनी यापूर्वी सर्व भावांना प्रत्येकी एक एकर शेत जमीन वाटून दिली आहे. दीपचंद यांची आई जिंवत असल्याने दीपचंद स्वतःची व आईच्या वाट्याची शेत जमीन स्वतः करतात. या जमीनीते बहुधा धान पीक लागवड करीत असल्याचे माहिती दिली. दरम्यान, दीपचंदचे मोठे भाऊ रातीराम यांच्या मुलीचा विवाह घटनेतील आरोपी राहुल राऊत यांच्याशी झाला होता. लंगनानंतर दोन वर्षांत मुुलीचा मृत्यू झाला. रातीरामचा मृत्यू झाल्याने त्याची पत्नी सरीता माहेरी खैर्णा येथे राहत आहे. पौतीच्या निधनानंतर घटनेतील आरोपी राहुल सासू सोबतच खैर्णा येथे राहत होता.

आरोपी पसार ; चाकू घेऊनच जखमी पोहोचला रुग्णालयात

पुतण्या जावयाने सासर्‍यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. हा चाकू हल्ला छातीवर व हातावर झाल्यावर जावयाने चाकू शरीरातच सोडत घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी सासऱ्यांनी चाकू घेऊनच रुग्णालय गाठले. वृत्त लिहीस्तोर गुन्हा दाखल झाला नसून लाखांदूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

घटनेतील जखमी दीपचंदने आपली वहिनी सरिताशी बोलून तुमच्या नावे असलेली शेतजमीन मी करतो व तुम्हाला वर्षभर लागणारे अन्नधान्य पुरवितो अशी हमी दिली. मात्र माझ्या मृत पत्नीच्या वाट्याला असलेली शेत जमीन मला द्या अशी आरोपी राहुलची मागणी होती. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास दीपचंद किराणा दुकानात किराणा साहित्याची खरेदी करण्यासाठी जात असताना घटनेतील आरोपी राहुलने मामाजी या म्हणून आवाज दिला. दोन-तीनदा आवाज दिल्यासमुळे दिपचंद जावयाकडे गेला. पूर्वणियोजित कटाने आलेल्या जावयाने सासऱ्याला जमिनीवर पाडून त्याच्या छातीवर चाकुने हल्ला केला.

या घटनेची माहिती या नागरिकांच्या लक्षात येताच जखमीला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार करत प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच ठाणेदार शिरीष भालेराव, पोलीस हवालदार राजेंद्र कुरुडकर, संतोष चव्हाण यांसार्य अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट देत धटनेचा पंचनामा केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *