प्रलंबित देयके तातडीने द्या, छोट्या कंत्राटदारांना दिलासा द्या!

 

 

महाराष्ट्र राज्य इंजिनिअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

तुमसर : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच छोट्या व मध्यम कंत्राटदारांच्या विविध समस्या आणि प्रलंबित देयकांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य इंजिनिअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी अभियंते आणि कंत्राटदारांच्या अडचणी मांडून त्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी केली. या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.

राज्यात विविध शासकीय विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे एक ते चार कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीची कामे करणाऱ्या छोट्या कंत्राटदारांची जुनी देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचा मुद्दा इंजि. पडोळे यांनी उपस्थित केला. अनेक कंत्राटदारांनी शासकीय कामे पूर्ण करून संबंधित विभागांकडे बिले सादर केली आहेत. असे असतानाही त्यांना वेळेत पैसे मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *