बाबासाहेबांच्या विचारावर कार्य केले पाहिजे!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन भारतासाठी मजबूत संविधान निर्माण केले. विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी आज पवनी येथे केले. पवनी येथील गांधी भवन येथील सभागृहामध्ये आज झालेल्या बर्फातील ज्वाला या साप्ताहिकाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून आमदार डॉ.परिणय फुके प्रमुख उपस्थितीमध्ये भदंत संघरत्न मानके, साप्ताहिक बर्फातील ज्वालाचे संपादक मनोहर मेश्राम यांच्या सह गणमान्य नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. वाही येथील शासकीय विश्रामगृहावर मंत्री महोदयांचे आगमन झाले.

यावेळी त्यांच्या स्वागताला आमदार परिणय फुके,आमदार अविनाश ब्राह्मणकर सहायक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात कवितेने करून डॉ. रामदास आठवले यांनी मनोहर मेश्राम यांच्या कार्याचे कौतुक केले. श्री. मेश्राम यांनी व्रतस्थ पद्धतीने साप्ताहिक चालवले आणि ते करताना त्यांनी समाज हिताबाबत लिखाण केले. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे सच्चे कार्यकर्ते मनोहर मेश्राम असल्याचा उल्लेख डॉ.रामदास आठवले यांनी केला. यावेळी आमदार डॉ.परीणय फुके यांनी १७ वर्षापासून अग्रेसर वृत्तपत्र समतेसाठी लढणारे वृत्तपत्र असल्याचे बर्फातील ज्वाला असल्याचे सांगितले तसेच आताच्या काळात इतकी वृत्तपत्र व्यवसायातील निष्ठा वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *