भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ‘जनसेवा सप्ताह’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा जयंती निमित्त जनसेवा सप्ताहचे औचित्य साधून आज दि. २३ जुलै २०२६ ला महाबोधी एज्युकेशन सोसायटीच्या दादाजी ज्येष्ठ नागरीक वृध्दाश्रम भंडारा व संकल्प व्यसनमुक्ती केंद्रामधील लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून फळे, अल्पोपहार व बिस्कीट वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत सहकार, सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या सोबत कार्य करीत असतांनाचे आपले अनुभव व्यक्त केले. प्रदेश महासचीव धनंजय दलाल यांनी जनसेवा सप्ताह बद्दल माहिती देत स्व. अजितदादा पवार यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक मनोहर गणविर यांनी अजितदादा पवार यांच्या सोबत कार्य करतांनी त्यांच्या कार्यावर उजाळा देत त्यांचा गौरव आपल्या शब्दात व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार मनिष वासनिक यांनी मानले. यावेळी डॉ. रविंद्र वानखेडे, हेमंत महाकाळकर, शेखर (बाळाभाऊ) गभने, राजु सलाम पटेल, राहुल निर्वाण, अरुण भेदे, भानुदास बनकर दादाजी जेष्ठ नागरीक वृध्दाश्रमचे अधिक्षक वैभव मेंढे, परिचारीका सुवर्णा पाटील, चंदु सोनवाने, संकल्प व्यसनमुक्ती केंद्राचे अधिक्षक नेमिता राहाटे, समुपदेशक रंजीत शिंगाडे, हितेश नेमा, परिचारिका रिता गोस्वामी, अभय भुते, मोहित नेवार, माधव बहिरे या दादाजी वृद्धाश्रम व संकल्प व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाºयांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोलाचे सहकार्य केले

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *