भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तिरोडा येथील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात दिनांक २२ रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभियानादरम्यान नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
यामध्ये प्रामुख्याने भूमी अभिलेख विभागांतर्गत नागरिकांना सनद वाटप महसूल विभागामार्फत वारस फेरफार,नाव दुरुस्ती आदेश, जमिनीचे पोट हिस्सा वाटणीपत्र आदेश,अतिक्रमण जागेचा पट्टे वाटप, जातीचे प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्र, संजय गांधी योजना मंजुर प्रकरणे आदेश आधार कार्ड प्रकरणे, रेशन कार्ड वाटप , समर्पित प्रमाणपत्र, वनहक्क पट्टे वाटप मैय्यत लाभार्थी ,वारस फेरफार ७/१२ वाटप, जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, कृषी विभाग शेतकरी यांना ट्रॅक्टर वाटप, सबसिडी प्रमाणपत्र, पीएम किसान योजना पात्र लाभार्थी प्रमाणपत्र,पोलिस विभाग, सायबर अंतर्गत रक्कम परतावा, मोबाईल वाटप,महावितरण, सौर उर्जा वाटप लाभार्थी यांना सबसिडी वाटप प्रमाणपत्र, बाल विकास प्रकल्प अधिकारीमहिला बचतगट अंतर्गत धनादेश वितरण किट, आरोग्य विभागसिकलसेल तपासणी व आरोग्य तपासणी, महिला गरोदर माता यांना किट वाटप,वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग अंतर्गत नुकसानग्रस्त शेतक-यांना धनादेश वाटप , शेतकरी कुंपण योजना लाभार्थी वाटप,पशुसंवर्धन विभाग, जनावर व बकरी पालन लाभार्थीचे सबसिडी वाटप प्रमाणपत्र,पाटबंधारे विभाग, मत्स्य व्यवसाय करणाºयांना बिज वाटप, नगरपरिषद तिरोडा , महिलांना बचत गट अंतर्गत किट वाटप शासन निर्णयानुसार महिलांना शेतकरी दर्जा महिला शेतकºयांना ९१६ प्रमाणपत्र, शासकीय जमिनीवर निवासी अतिक्रमण असलेल्यां १०१ इसमास प्रमाणपत्रे, तुकडेबंदी लाभ १६, कुभांर समाजाचे पात्र १७ लाभार्थ्याना शासनाच्या लोकाभिमुख योजना व सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने महसूल विभागामार्फत हे अभियान राबविण्यात आले.
यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा, रजनी कुंभरे, जी.प. समाजकल्याण सभापती,न.प.अध्यक्ष अशोक असाटी, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, प.स.सभापती तेजराम चव्हाण, उप्विभागीय अधिकारी पूजा गायकवाड,, तहसीलदार तिरोडा नारायण ठाकरे, तहसीलदार गोरेगाव प्रज्ञा भोकरे, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी अमोल माळकर,पोलीस निरीक्षक अमित वानखडे,गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, सरीपुत्र धोटे, महिला बालविकास अधिकारी, विनोद चौधरी, तालुका कृषी अधिकारी आकाश गेडाम, लालन राजपूत तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.