
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मनरेगा बचाव, बीव्हीजी ग्रामजी हटाव, निराधार, घरकुल, पट्टे इत्यादीसाठी लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे दिनांक २३ जून २०२६ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करून राष्ट्रपतीच्या नावे सावन कुमार जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले. भारतीय खेत मजदूर युनियन (बीकेएमयु) च्या देशव्यापी आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका जिल्हा भंडारा तर्फे हे आंदोलन करण्यात आले. निवेदनात केंद्र सरकारने केलेल्या विव्हिजी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा कायदा पूर्ववत कायम ठेवा, अतिक्रमीत शेतजमिनीचे पट्टे द्या व प्रलंबित वनहक्क प्रकरणे तातडीने निकाली काढा, अतिक्रमित घरकुलधारकांना पट्टे द्या व घरकुलासाठी ५ लाख रुपये अनुदान द्या, निराधार बेघरांना मोफत घरे द्या व मानवाधिकारापासून वंचितांना नागरी सुख सुविधा पुरविण्यात यावे, श्रावण बाळ व इतर निराधारांना ६ हजार रुपये पेन्शन द्या व साठ वर्षे वयो मयार्दा करा, या मागण्यांच्या समावेश होता.
या आंदोलनाला ओबीसी संघर्ष समितीने आपला पाठिंबा जाहीर केला होता. धरणे आंदोलनात प्रामुख्याने कॉ.हिवराज उके, कॉ.गजानन पाचे, कॉ.सदानंद इलमे, कॉ.प्रियकला मेश्राम, कॉ.भगवान मेश्राम, कॉ.वामनराव चांदेवार, कॉ.माणिकराव कुकडकर, गणेश क्षीरसागर, प्रताप डोंगरे, अनिल कोहाड, दीपक अंकुशे, कैलास अंकुशे, गौतम भोयर, दिलीप चोपकर, अल्का बावनकर, दिलीप ढगे, माया हिवराज रामटेके, कोमल उईके, शीला ढवळे, सरस्वती उईके, नुरी नैताम, चांद उईके, रिंकू ढवडे, संगीता शहारे, लक्ष्मीशंकर चौधरी, करिष्मा निषाद, किशोर मेश्राम, शारदा मेश्राम, प्रभाकर वैरागडे, धनश्री ढगे, अर्चना ढगे इत्यादींची उपस्थिती होती.