महालगाव नजीक रेल्वे मार्गावर बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील महालगावजवळ रेल्वे मार्गावर बिबट्याच्या बछड्याचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ६ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे महालगाव परिसरात खळबळ उडाली असून, वन्यजीवांच्या अधिवासातून जाणाºया रेल्वे मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महालगावजवळील रेल्वे मार्गावर सकाळच्या सुमारास एका बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह रेल्वे कर्मचाºयांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. मृत बछडा अंदाजे ८ ते १० महिन्यांचा असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

वनविभागाकडून पंचनामा व तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच महालगाव व मोरगाव अर्जुनी वनपरिक्षेत्रातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बछड्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रिया केली.

रेल्वे मार्गालगत वन्यजीवांचा वावर

महालगाव परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल व वनक्षेत्र असल्याने या भागात विविध वन्यप्राण्यांचा वावर आढळतो. जंगलातून जाणाºया रेल्वे मार्गामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *