भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पोलीस ठाण्यातील एका पथकाने लाखनी स्मशानभुमी जवळ रविवारी (ता. ९) ला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास रेतीने भरलेला लाल रंगाचा विना क्रमांकाचा स्वराज कंपनीचा ट्रँक्टर पकडला मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाही न करता मांडवली करून सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे रेती चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून पकडलेल्या कर्मचार्यांना वरिष्ठ अधिकाºयांचे फोन येत होते अशी माहिती आहे. मात्र कार्यवाही करण्यास परावृत्त करणारा फोन करणारा कोण? याची चौकशी झाल्यास मोठा घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाखनी तालुक्याला चुलबंद नदी लागून असल्याने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असून याला महसूल व पोलीस विभागाचा आशीर्वाद असल्याने तस्करांचे मनोबल वाढले असून रात्रीच्या वेळेला टिप्परद्वारे रेती लाखनीत आणून त्याचे मोठे ठिय्ये राष्ट्रीय महामार्गालगत तयार करून त्यात रेती साठवून त्याची गरजू लोकांना अधिक दराने त्याची विक्री होत असून सद्यस्थितीत ७००० दरानेरेतीची विक्री जोमात सुरु आहे. विनाक्रमांकाच्या लाल रंगाच्या स्वराज कंपनीच्या ट्रँक्टर ट्राली मध्ये मुरमाडी येथील ठिय्या (साठा करून ठेवलेल्या) वरून रेती मानेगाव कडे जात असल्याची कुणकुण पोलीस कर्मचाºयाला लागली त्यांनी लगेच ट्रँक्टर च्या मागावर जात स्मशानभुमी जवळ ट्रँक्टर अडवला वतपासणी केली असता रेती आढळून आली.
सदर ट्रँक्टर ट्राली पोलीस स्टेशन ला जमा न करता राँयल्टी च्या नावावर की मांडवलीच्या नावावर हा ट्रँक्टर मात्र परस्पर सोडून देण्यात आल्याने यात मोठी आर्थिक देवान झ्रघेवाण तर झाली नाही ना? त्यामुळे हि न समजणारी राँयल्टी दिली कुणी? याचाही शोध घेण्याची गरज असून लाखनी परिसरात अनेक ठिकाणी रेतीची अनेक ठीय्ये असून याचाही शोध घ्यावा. अशी मागणी होत असून सदर ट्रँक्टर प्रकरणाची फेर चौकशी करून कारवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशीच कारवाही सालेभाटा जवळ पकडण्यात आलेल्या ट्रँक्टर प्रकरणात झाली असल्याची नागरिकांत चर्चा आहे.