भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पती पत्नीसोबतच्या प्रेम संबंधाचा व विवाहाचा गैरफायदा घेवुन गेल्या ४ वर्षापासून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडल्याने त्रस्त झालेल्या पत्नीने पोलीस स्टेशन गाठून सर्व कैफियत सांगितल्यावर पोलिसांनी पती, सासू, सासºयावर गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक केली असून न्यायालयाने बुधवार (१२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लाखनी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात गेल्या ४ वषार्पासून पती त्याच्या ३३ वर्षीय पत्नीकडून देहव्यवसाय करीत होता यात सासू सहकार्य व पाठबळ देत होती. तसेच पतीने केलेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात घडून आला. तसेच पती, सासू व सासरा यांनी शारीरीक, मानसीक व आर्थीक शोषण करुन तिला वारंवार मारहाण शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्रस्त झालेल्या विवाहितेने पोलीस स्टेशन गाठून सर्व कैफियत सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असूनत्यांना अटक केली असून न्यायालयाने बुधवार (ता. १२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास लाखनी पोलीस निरीक्षक आशिष गजभिये करीत आहेत.