भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांचा फार्मर आयडी आवश्यक आहे. मात्र, सन २०२४ नंतर वारस फेरफार अथवा खरेदी-विक्री झालेल्या अनेक शेतकºयांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झालेला असतानाही त्यांचे फार्मर आयडी अद्ययावत झालेले नाहीत. त्यामुळे पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या समस्येची दखल घेत तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय भरत रहांगडाले यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे संबंधित शेतकºयांचे फार्मर आयडी तातडीने अपडेट करण्याची मागणी केली आहे.
सन २०२४ नंतर वारस फेरफार अथवा खरेदी-विक्री झालेल्या शेतकºयांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाला आहे. मात्र, त्यानुसार फार्मर आयडीमध्ये आवश्यक सुधारणा झालेली नसल्याने शेतकºयांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. विशेषत: कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविताना ही बाब अडथळा ठरू शकते. संबंधित यंत्रणेला तातडीने आदेश देऊन सन २०२४ नंतर वारस फेरफार अथवा खरेदी-विक्री झालेल्या सर्व पात्र शेतकºयांचे फार्मर आयडी अद्ययावत करावेत, अशी मागणी आमदार रहांगडाले यांनी केली आहे. फार्मर आयडी अपडेट झाल्यास पात्र शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होईल. शेतकºयांच्या हिताचा हा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.