भंडारा पत्रिका/प्रतिनिधी,लाखनी : लाखनी नगरपंचायत उपाध्यक्ष पदाची अतितटीची निवडणूक आज नगरपंचायत कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अरमान धरमसारे यांनी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अश्विन धरमसारे यांचा एका मताने पराभव करत उपाध्यक्षपदावर वर्णी मिळवली. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून अरमान धरमसारे तर भाजपकडून अश्विन धरमसारे यांनी अर्ज दाखल केला होता. झालेल्या मतदानात अरमान धरमसारे यांना ९ मते तर अश्विन धरमसारे यांना ८ मते मिळाली. एका मताच्या फरकाने अरमान धरमसारे विजयी झाले. या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुধে, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, तालुकातध्यक्ष उमराव आथोडे आणि शहर अध्यक्ष धनु व्यास यांना दिले. यावेळी नगरसेवक सचिन भैसारे, त्रिवेणी पोहरकर, प्रेरणा व्यास, लता रोडे, विभा हजारे, कांताबाई निर्वाण, सविता सोनवणे, ज्योती निघाडे तसेच मनोज पोहरकर, विक्रम रोडे, राजू निघाडे, दिनेश निर्वाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.