भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील धोप येथील कर्जबाजारी शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येला सरकार व संबंधीत अधिकारी दोषी असुन या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि संबंधित अधिकाºयांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी द्यावी अशी यावेळी करण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते.
भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला. मात्र, मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यांतील परिस्थितीही गंभीर असताना या तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून का वगळण्यात आले असा सवाल रेहपाडे यांनी उपस्थित केला. पालकमंत्री पंकज भोयर हे मोहाडी तालुक्याच्या दौºयावर आले असताना धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी त्यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या होत्या. शेतातील परिस्थिती पाहण्यासाठी बांधावरयेण्याची तसेच शेताजवळील नहराच्या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती सपाटे यांनी केली होती मात्र, पालकमंत्र्यांनी ना संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला नाही शेतकºयाच्या शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही, असा आरोप संजय रेहपाडे यांनी यावेळी केलो.
नहराच्या समस्येसंदर्भात संबंधित अधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचे सपाटे यांचे म्हणणे होते, असेही रेहपाडे यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर शेतकरी आधीच कर्जबाजारीपणा आणि शेतीतील संकटांमुळे त्रस्त असताना त्याच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर परिस्थिती वेगळी असती, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. सपाटे यांच्या आत्महत्येप्रकरणी पालकमंत्री आणि संबंधित अधिकाºयांच्या भूमिकेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही रेपाहडे यांनी यावेळी केली.
पालकमंत्र्यांच्या दौºयाचा उद्देश दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकºयांच्या समस्या जाणून घेणे हा होता की केवळ औपचारिक दौरा, असा सवाल संजय रेहपाडे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री पंकज भोयर यांना मंत्रिपदावरून दूर करावे, तसेच शेतकºयांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया संबंधित अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रेहपाडे यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, शहरप्रमुख राकेश आग्रे आणि शहर संघटक मयूर जोशी आदि उपस्थित होते.