भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा आणि शेती अधिक समृद्ध व्हावी, यासाठी महायुती सरकार सातत्याने शेतकरीहिताच्या विविध योजना राबवत असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राज्यातील शेतकºयांसाठी ऐतिहासिक ठरणार असून, या योजनेअंतर्गत सुमारे ५६ लाख शेतकºयांचे ४२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार प्रा. संजय भेंडे यांनी दिली. भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या शेतकरी कल्याणकारी धोरणांचा आढावा घेत विविध योजनांची माहिती दिली. आ. भेंडे म्हणाले की, भाजप सरकारने नेहमीच शेतकºयांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
राज्यातील ४५ लाख शेतकºयांची सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची कृषी वीजबिलाची थकबाकी माफ करण्यात आली आहे. याशिवाय जलयुक्त शिवार अभियान, महिला शेतकरी सक्षमीकरण उपक्रम, ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल माफ, शेतकºयांना १२ तास वीजपुरवठा, मागेल त्याला शेततळे योजना, केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन योजना यांसारख्या अनेक योजनांचा लाभ लाखो शेतकरी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक सक्षम करण्यासाठी डेटा, ड्रोन, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा वापर वाढविण्यात येत असून, यामुळे शेतकºयांना आधुनिक शेती पद्धतींचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढकरण्यासाठी राज्य सरकारकडून २६ नव्या धरणांची उभारणी तसेच १६ जुन्या धरणांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांमुळे सिंचनक्षमता वाढून शेती उत्पादनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ. भेंडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही दुसरी शेतकरी कर्जमाफी असून, यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीचा विचार न करता, केवळ शेतकºयांच्या हितासाठी कोणत्याही अटी-शर्तींश्-ि ावाय ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकºयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, भंडारा नगराध्यक्ष मधुराताई मदनकर, भगवान चांदेवार, मयूरजी बिसेन, कल्यानी निखाडे, चैतन्य उमाळकर, चंद्रकलाताई भोपे, सचिन घनमारे, नितीन गायधने, शैलेश खरोले, तिलक वैद्य, संदीप मेश्राम, वृषाली ब्राह्मणकर, प्रीती गाढवे , निमेश ढोकरीमारे, संदीप मेश्राम, विजय लिचडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.