साडेसातशे किलोमीटर पार करून सायकलवीर पोहचले पंढरपूरला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील आठ सायकलपटू ४ जुलैला ७५० किलोमीटर दूर असलेल्या पंढरपूर येथे सायकलने निघाले होते. आठही सायकलपटू नियोजित वेळेत शुक्रवारी ता. १० ला पंढरपूर येथे पोहचले. भंडारा जिल्यातील राजकुमार बावणकर, प्रमोद नेवारे, दादा ठाकरे, प्रवीण कारेमोरे, अमोल मानापुरे, सुधीर गायधने व अमोल वाडीभस्मे आणि तुमसर येथील डॉ. अजय आगाशे हे सायकलपटू पंढरपूर येथे होणाºया सायकल रिंगणात सहभागी होण्यासाठी शनिवारी ता. ४ जुलैला रवाना झाले. मजल दरमजल करीत विपरीत नैसर्गिक परिस्थितीचा सामना करीत शुक्रवारी ता. १० जुलै ला पंढरपूर येथे पोहचले. चंद्रभागा नदीत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतले. पंढरपूर येथे रविवारी ता. १२ ला पंचम अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला त्यात त्यांनी सहभाग घेतला. या रिंगण कार्यक्रमात राज्यभारतील सायकलपटू सहभागी झाले होते. या कार्यक्रमात राजकुमार बावणकर, प्रमोद नेवारे, दादा ठाकरे, प्रवीण कारेमोरे, अमोल मानापुरे, सुधीर गायधने, अमोल वाडीभस्मे व डॉ. अजय आगाशे या सायकलपटंूनी भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले. सदर सायकलपटू आज सोमवारी दि. १३ जुलै रोजी भंडारा शहरात पोहचले. त्यांच्या आगमणानिमित्त भंडारावासीयांनी त्यांचे स्वागत केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *