भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विनायक नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा कार्यालय परिसरात संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश सुपारे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभेच्या सुर- वातीला संस्थेच्या दिवंगत सभासदांना सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संस्थेने आर्थिक विकासाची वाटचाल करीत आर्थिक स्थैर्य प्राप्त केल्याची व संस्था सातत्याने विकासाच्या प्रगती पथावर असल्याचे सांगीतले व संस्थेचे सर्व सभासद संचालक, कर्मचारी नित्यनिधी अभिकर्ते या सर्वांचा या विकासात सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर संस्थेचा जमा खर्च व इतर आर्थिक विवरण पत्रकांना मंजुरी देण्यात येवून मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या संस्था सभासदांच्या पाल्यांचा स्मृतीचिन्ह व रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
निवृत्त कर्मचारी श्री. निर्वाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर नीट परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम स्थान प्राप्त करून भंडारा शहराचा नावलौकीक वाढविणाºया नमीरा सिद्दीकी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ७५ वर्ष वय पुर्ण केलेल्या संस्थेच्या जेष्ठ सभासदांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेने केलेल्या प्रगतीबद्दल काही सभासदांनी आपले मनोगत मांडले. संस्थेचे संचालक नित्यनिधी अभिकर्ते व सभासद बंधु भगिनी, सत्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते. जिल्हा सहकार विभागाचा अधिकार संस्थेचे व्यवहार असलेल्या सर्व बँका, सभासद पालक यांचे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती लतिका मोहोकार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे व्यवस्थापक अशोक उमाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.