डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा साकोलीत निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन  , भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने साकोली येथे उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांना निवेदन सादर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हे निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात आरोपींवर तात्काळ व निष्पक्ष कारवाई, महाराष्ट्र मेडिकल सेवा व्यक्ती व मेडिकेअर सेवा संस्था हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम-२०१० मध्ये प्रभावी सुधारणा, आरोग्य संस्थांमध्ये २४७७ सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण, ‘झिरो टॉलरन्स अगेंस्ट हेल्थकेअर व्हायोलन्स’ धोरणाची अंमलबजावणी तसेच देशभरासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली.

डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाºयांना निर्भय व सन्मानजनक वातावरणात सेवा देण्याची हमी शासनाने द्यावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. निवेदन देणाºया प्रतिनिधी मंडळातNIMA चे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश टी. चंदवानी, कार्याध्यक्ष डॉ. अभय हजारे, उपाध्यक्ष डॉ. पंकज चिरवतकर, सहाय्यक सचिव डॉ. सचिन निंबार्ते, डॉ. राजीव गोंधुळे, डॉ. नरेंद्र कुंभरे, डॉ. आशिष गभणे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. दिलीप फरांदे, डॉ. केशव कापगते, डॉ. गणेश पुस्तोडे, डॉ. नितीन आर. गुप्ता, डॉ. तुषार मसके, डॉ. विलास गोबाडे, डॉ. मारोती बोरकर, डॉ. दीपक चंदवानी, डॉ. भास्कर गायधने व डॉ. नितीन बोरकर यांचा समावेश होता. यावेळी, मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही NIMA च्या पदाधिकाºयांनी दिला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *