धारदार शस्त्राने कामगाराची हत्या

मुंडीपार (एमआयडीसी) परिसरातील घटना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गोंदिया : कामावर जात असलेल्या ५८ वर्षीय इसमावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास तालुक्यातील एमआयडीसी मुंडीपार येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविशंकर उदयलाल रहांगडाले (५८) रा. मुंडीपार असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविशंकर हे मंगळवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घरून कामावर जात असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केले. ज्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गंगाझरी पोलिसांना देण्यात आली.

ठाणेदार धीरज राजूरकर यांच्या नेतृयात गंगाझरी पोलिसांनी घटनास्थल गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथील केटीएस सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. हत्येमागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर करीत आहेत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *