पहिल्या श्रावण सोमवारी शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने तुमसर दुमदुमले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी तुमसर शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली. यंदा पहिल्या श्रावण सोमवारीच नागपंचमीचा दुग्धशर्करा योग आल्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. भल्या पहाटेपासूनच शिवभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. विशेषत: तुमसर येथील टिळक नगर परिसरातील शिवमंदिरात सकाळपासूनच भक्तांची प्रचंड मांदियाळी पाहायला मिळाली. भाविकांनी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक, जलाभिषेक करत बेलपत्र आणि पत्री अर्पण करून दर्शन घेतले. ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. नागपंचमी आणि श्रावण सोमवार असा दुहेरी पर्वकाळ असल्याने मंदिरात विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना शिस्तबद्ध रीतीने दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *