पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी सात हजारांची लाच; ग्रामपंचायत अधिकाºयाला अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : आईच्या नावावरील शेतजमिनीवर पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (६ आॅगस्ट) दुपारी साकोली-वडसा मार्गावरील लाखांदूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आली. या कारवाईमुळे लाखांदूर तालुक्यातील प्रशासकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुधीर संजय उके (२८, रा. आंबेडकर चौक, लाखांदूर) यांच्या आईच्या नावे मौजा मोहरणा येथे शेतजमीन आहे.

या शेतजमिनीवर पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मोहरणा येथे आईच्या नावाने लेखी अर्ज करून पोल्ट्री फार्मसाठी आवश्यक एनओसी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. हा अर्ज ग्रामपंचायत मोहरणा येथील ग्रामपंचायत अधिकारी रंजु मधुकर अंबादे (४१) यांच्याकडे देण्यात आला. अंबादे यांनी संबंधित एनओसी देण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यानही संबंधित ग्रामपंचायत अधिकाºयाने तक्रारदाराकडे सात हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून का- रवाई केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी रंजु अंबादे यांना पथकाने पकडले. त्यांच्याकडून सात हजार रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या चार नोटा, २०० रुपयांच्या २४ नोटा आणि १०० रुपयांच्या दोन नोटांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान आरोपीकडून एक सॅनडिस्क कंपनीचे ३२ जीबी मेमरी कार्ड, अ‍ॅपल कंपनीचा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल, विवो कंपनीचा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल तसेच मोहरणा ग्रामपंचायत कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्रही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस निरीक्षक नितेश कुशाबराव देशमुख, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांच्या फियार्दीवरून लाखांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप भोयर करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *