भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी नगर पंचायतीतील सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण मिळाले असून नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांच्या विरोधात नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला होता. त्या अनुषंगाने ३१ जुलै ला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्रिवेणी पोहरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठातील २ सद्सीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र नगराध्यक्ष पदाची खुर्ची रिकामी होती. आज शुक्रवारी (ता. ७) ला त्रिवेणी पोहरकर पुन्हा नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आहेत. १७ आॅगस्ट ला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज्यात तसेच स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती असताना लाखनी नगर पंचायतीतील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा ंविरोधात अविश्वासाची मोहीम राबविण्यात आल्याने लाखनीवासीयांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.