मोहगाव खदानच्या सरपंचा अखेर पायउतार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत मोहगाव खदानच्या सरपंचा पाय उतार झाले असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. या वृत्ताने तुमसर तालुक्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. अंदाजे ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतची लोकसंख्या १५०० च्या घरात असून सरपंचासह सदस्य संख्या ८ असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायत मोहगाव खदानच्या सरपंचा मालतीताई रामकृष्ण डडेमल यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळेच अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी ऐतिहासिक निकाल दिला व मालती ताई डडेमल यांना अपात्र ठरविले आहे.या प्रकरणाची तक्रार रिकेश विनोद मेश्राम यांनी केली होती हे येथे उल्लेखनीय .

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *