भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पवनी तालुक्यातील सरस्वती प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सुदाम सहारे यांना नुकताच पार पडलेल्या ‘कर्तृत्वान शिक्षक सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील एकूण ३१
शिक्षकांना या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले असून, मध्ये सहारे सरांचा समावेश आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची आणि शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा या ग्रामीण व मागास भागात अत्यंत सामान्य परिस्थितीत सहारे यांचा जन्म झाला, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील शारीरिक आजाराने त्रस्त असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर अवलंबून होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
परिस्थितीसमोर हार मानली नाही
आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षणाचा मार्ग खंडतर असतानाही सहारे यांनी हार मानली नाही. उच्च शिक्षणासाठी त्यांनी वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डी.एड.चे शिक्षण पूर्ण करून अल्पवयातच स्वकष्टत्वाच्या जोरवर सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. शिक्षुकी पेशात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शाळेच्या प्रगतीला त्यांनी प्राधान्य दिले. शांत, मनमिळाऊ आणि सहकार्याची भावना असलेला स्वभाव यामुळे सहकाऱ्यांमध्ये त्यांचा चांगला संपर्क निर्माण झाला. सहकाऱ्यांच्या सहकार्याने शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
सामोरे जात त्यांनी शाळा पुन्हा प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले, शाळेच्या विकासासाठी सातत्याने धडपड करत त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारीही सोपविण्यात आली.
अडचणींच्या काळातही शाळेला सावरले
शाळेची वाटचाल सुरळीत सुरू असतानाच परिस्थिती बदलली, काही सहकारी शिक्षक इतरत्र गेल्याने शाळेची जबाबदारी मोठ्या प्रमाणात सहारे यांच्या खांद्यावर आली, शाळेची अधोगती होण्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाही त्यांनी खचून न जाता खंबीरपणे जबाबदारी स्वीकारली. एकट्याच्या बळावर विविध अडचणींना
पुरस्कार म्हणजे कार्याची पावती
आज सहारे हे एका संस्थेचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत, प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेले स्थान आणि शाळेच्या विकासासाठी केलेले कार्य याची दखल ‘कर्तृत्वान शिक्षक’ पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे, हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती असल्याची भावना होत आहे. आहे.
सहारे यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ग्रामीण व आर्थकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतून आलेલા विद्यार्थ्यांसाठी त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरत आहे, जिद्द, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बब्वर परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते, हे त्यांच्या वाटचालीतून अधोरेखित झाले आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठीही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.