बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या शाळेत शिक्षण घेणाºया २१ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या शाळेमध्ये एकही नियमित शिक्षक कार्यरत नसल्यानेविद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून मुलांना बसण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत. शाळेच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कधीही अपघात होण्याची शक्यता असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकºयांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.गावकºयांमध्ये या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी असून प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. शाळेची तातडीने दुरुस्ती करून नियमित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *