भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि. भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक, भंडारा यांच्या वतीने बँकेच्या मुख्य शाखेत बँकेचे संचालक तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन आणि नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांचा उत्साहपूर्ण वातावरणात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी संसदीय व विधिमंडळातील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व आणि योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.
सत्कार सोहळ्यात राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांनी बँकेने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनीही सहकार चळवळ बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला आमदार राजूभाऊ कारेमोरे, नाना पंचबुद्धे, जयंत वैरागडे, रामदास शहारे, पांडुरंग खाटीक, जगदीश निंबार्ते, धनंजय दलाल, हेमंत महाकाळकर, महेंद्र गडकरी, श्रीकांत वैरागडे, देवेंद्र चौबे, लोमेश वैद्य, चेतन डोंगरे, विनय मोहन पशीने, आशु गोंडाने, राजू हाजी सलाम, शेखर बोरसे, धनंजय ढगे, मनीष वासनिक, लोकेश नगरे, अमन मेश्राम, सुनील साखरकर, शेखर गभणे, नरेश भगत, नंदू झंझाळ, आरजू मेश्राम, राहुल निर्वाण, शैलेंद्र पशीने, परवेज काझी, हरीश मदान, विशाल भोंगाडे, श्री मुलतानी यांच्यासह बँकेचे गणमान्य सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.