महावितरणच्या ‘ग्राहक समाधान शिबिरा’ त जिल्ह्यातील ९२ टक्के तक्रारींचा जागेवरच निपटारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपूर जिल्ह्यात वीज ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ, पारदर्शक आणि प्रभावी निवारण करण्यासाठी महावितरणतर्फे आयोजित ‘ग्राहक समाधान शिबिराला’ वीज घ्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. बुधवारी (दि. १९ आॅगस्ट २०२६) नागपूर शहर मंडलात तर, गुरुवारी (दि. २० आॅगस्ट २०२६) नागपूर ग्रामिण मंडलात पार पडलेल्या या शिबिरामध्ये वीज ग्राहकांच्या विविध अडचणींचे जागेवरच समाधान करण्यात आले असून, जिल्ह्यात प्राप्त झालेल्या एकूण ५९७ तक्रारींपैकी तब्बल ५४७ तक्रारींचे (म्हणजेच ९२.५५ टक्के) आॅन दि स्पॉट यशस्वी निवारण करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

उर्वरित ५० तक्रारी देखील पुढील सात दिवसांच्या आत प्राधान्याने सोडवण्यात येतील, असा विश्वास महावितरणतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर मंडलांतर्गत येणाºया कॉग्रेसनगर, महाल, गांधीबाग, सिव्हील लाईन्स आणि बुटीबोरी या विभागात आणि अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांच्या नेतृत्वाखाली नागपुर ग्रामिण मंडलांतर्गत येणा-या मौदा, उमरेड, सावनेर आणि काटोल विभागातील सर्व उपविभागांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वीज ग्राहकांच्या समस्या त्यांच्याच कार्यक्षेत्रात जलदगतीने सुटाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये प्रामुख्याने नवीन वीज जोडणी, वीज बिलांमधील नावात व पत्त्यात बदल, सरासरी व वाढीव वीजबिले, रुफ टॉप सौर योजना तसेच आधुनिक स्मार्ट मीटरशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व समस्यांचे तात्काळ उच्चाटन करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते आणि सर्व संबंधित तांत्रिक कर्मचारी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्ह्यात स्मार्ट मीटरबाबत आलेल्या ८० पैकी ७१ तक्रारींचे जागीच निराकरण निराकरन करण्यात आलेयाने स्मार्ट मीटरविरोधातील ओरड निव्वळ ग्राहकांची दिशाभुल करण्याचा प्रकार असल्याची प्रचिती आल्याचे मनोगत अनेक ग्राहकांनी यावेळि व्यक्त केले.यावेळी उपस्थित अधिकाºयांनी ग्राहकांशी संवाद साधत स्मार्ट मीटरबाबतच्या शंकांचे सविस्तर निरसन केले.

अचूक मीटर रीडिंग, दिवसा वीज वापरावर मिळणारी प्रति युनिट ८५ पैसे सवलत, ग्राहकाच्या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होणारी रिअल टाईम वीज वापराची नोंद आणि करंट लिकेजची अचूक माहिती यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे स्मार्ट मीटर अत्यंत पारदर्शक व फायदेशीर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रत्येक अडचणीला प्राधान्य देऊन ती सोडवली जाईल, अशी ग्वाही महावितरणने उपस्थित ग्राहकांना दिली. नागपूर शहर मंडलात हे ग्राहक समाधान शिबिर आता दर महिन्याच्या पहिल्या आणि तिस-या बुधवारी तर नागपूर ग्रामिण मंडलात प्रत्येक महिन्याच्या तिस-या गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत सर्व उपविभागिय कार्यालयांत आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *