वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षाने शिक्षकांच्या पदोन्नती रखडल्या

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : जिल्हा परिषद शिक्षक संवर्गातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नती प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे पात्र शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी १ सप्टेंबर २०२५ नुसार सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करून समुपदेशन प्रक्रिया पूर्ण केली असताना भंडारा जिल्हा परिषदेत अद्याप सेवा ज्येष्ठता यादीही जाहीर न झाल्याने शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना वेळोवेळी निवेदनातून पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी केली. मात्र वरीष्ठ अधिकारी याकडे लक्षच देत नसल्याने पदोन्नती रखडल्याने, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.

शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, १ सप्टेंबर २०२५ पूर्वी टीईटी पात्र ठरलेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी त्वरित प्रसिद्ध करून. विशेषत: २०१९ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या, टीईटी पात्रता पूर्ण शिक्षकांना पदोन्नतीच्या संधींपासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी मागणी केली जात आहे. पदोन्नती मध्ये होत असलेल्या दिरंगाईची दखल शासन व न्यायालयाने घेऊन तातडीने पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश संबंधित जिल्हा परिषदेला देण्यात आले, मात्र सदर आदेशाला मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केराचीटोपली दाखवत वेळ मारुन नेली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनेनी केला आहे. शासनाचे निर्देश व न्यायालयीन आदेशांची प्रभावीअंमलबजावणी करून भंडारा जिल्हा परिषदेत रखडलेली पदोन्नती प्रक्रिया महिन्यात पूर्ण करण्याची गरज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पदोन्नती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून समुपदेशनही पूर्ण झाले आहे. मात्र भंडारा जिल्हा परिषदेत प्रक्रिया अद्यापही थंडबस्त्यात का?, याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या निश्चिती करून सेवाज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती प्रक्रिया गतिमान करुन पात्र शिक्षकांना तातडीने पदोन्नती आदेश देण्याची मागणी शिक्षक संघटनेकडून केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *