शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा आज उद्योगमंत्री उदय सामंत मार्गदर्शन करणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानीक बालाजी लॉन साई मंदीर परिसर भंडारा येथे आज गुरुवार दिनांक २० आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता जिल्हा शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्यात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून आ. नरेंद्र भोंडेकर, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, भंडारा गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विलास चावरी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. मागील निवडणूकी नंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून संघटनात्मक कामांना गती देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी आगामी जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असुन मेळाव्याला शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख अनिल गायधने, जिल्हा प्रमुख पद्माकर बावणकर, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, उप जिल्हा प्रमुख विकास मदनकर, जिल्हा संघटक नितीन धकाते, शहर प्रमुख नरेंद्र बुरडे व रोशन काटेखाये यांनी केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *