सरस्वताबाई कोटगले यांचे निधन

भंडारा : येथील संताजी वार्डातील रहिवासी तथा दैनिक महासागर चे जिल्हा प्रतिनिधी सुरेश कोटगले यांच्या मातोश्री ग.भा. सरस्वताबाई लक्ष्मण कोटगले यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस प्रकृती स्थिर होती. मात्र पुन्हा जास्त प्रकृती बिघडल्याने दुसºया रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. मृत्यू समयी त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर भंडारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. ग.भा. सरस्वताबाई कोटगले यांचा स्वभाव अतिशय मृदू मनमिळावू होता. घरात मोठ्या असल्याने त्या सर्वांशी व सर्व त्यांच्याशी सलोख्याने वागत होते. त्यांच्या निधनाने कोटगले परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. त्यांना जिल्हा माहीती अधिकारी शैलजा वाघ, दि भंडारा अर्बन को- आॅपरेटिव्ह बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष मदान, जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक (युटुब) मीडिया, प्रिंट मीडिया प्रतिनिधी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *