जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या ई-केवायसीत शेतकºयांची लूट थांबवावी – महेंद्र मेंढे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: राज्य शासनाच्या कर्जमुक्त योजनेसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी करण्यासाठी शेतकºयांची आपले सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक सेवा केंद्रांवर ५० ते १५० रुपयांपर्यंत अवास्तव शुल्क आकारले जात आहे. ग्रामीण भागातील गरीब शेतकºयांना हे शुल्क परवडत नसल्याने ते योजनेपासून वंचित राहत आहेत. कोणतीही सेवा शुल्क नसतांनी मनमानी दराने पैसे मागितले जात आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या व ईकेवायसीच्या नावाखाली शेतकºयांची लूट थांबवावी अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे यांनी केले आहे.

दूर वरून ठिकठिकाणी जावे लागत असल्याने नेटवर्क समस्यामुळे तासंतास रांगेत उभे राहूनही काम होत नाही. त्यामुळे आले पाऊले घरी परत यावे लागत असल्याने वृद्ध शेतकºयांना समस्यांना पुढे जावे लागत असल्याने मोबाईलवरून सेल्फ ईकेवायसी करण्याची सुविधा तात्काळ शिथिल करावी. ज्या शेतकºयांकडे स्मार्ट मोबाईल व इंटरनेट आहे, त्यांनी घरबसल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे मोफत ई-केवायसी करता येईल. यामुळे सेवा केंद्रांवरील गर्दी कमी होईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि शेतकºयांचा वेळ व पैसा वाचेल. शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकºयांना दिलासा दिला आहे. मात्र ई-केवायसीच्या नावाखाली होणारी लूट थांबली नाही तर या योजनेचा उद्देशच साध्य होणार नाही. म्हणून तात्काळ मोबाईल सेल्फ केवायसी सुरू करून सेवा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे यांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *