भंडारा शहराच्या विकासात स्थानिक आमदारांची आडकाठी !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील विकास कामांसाठी शासनाने मंजुर केलेला कोटयावधी रूपयांचा निधी आ. भोंडेकर यांनी दुसरीकडे वळविल्याने भंडारा शहरातील विकासकामे रखडली असुन भंडारा शहराच्या विकासात आमदार आडकाठी आणत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाºयांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेतुन केला. आमदार नरेंद्र भोंडेकर हे महायुती मित्रपक्षाचे आमदार असतांनासुध्दा ते भाजप नेत्यांबद्दल बोलतांना चुकीच्या भाषेचा वापर करतात ते अशोभनीय आहे. त्यांनी तस करू नये अन्यथा भाजपसुध्दा त्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. भंडारा नगर परिषद निवडणुकीआधी भंडारा शहरातील विविध कामाची जवळपास १७ कोटी रूपयाची विकासकामांची निविदा मागविण्यात आली होती.

सदर कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. दरम्यान निवडणुका लागल्याने सदर प्रक्रिया थांबविण्यात येवुन निवडणुकीनंतर ती प्रक्रिया पुर्ण करून विकासकामे होणे अपेक्षीत होते.मात्र नगर परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाला अपयश आले.त्या पराभवाचा राग म्हणुन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा शहराच्या विकासाकरीता मंजुर असलेला निधी रद्द करवुन घेत तो निधी पवनी येथील तालुका क्रिडां गणासाठी वळविला.विशेष म्हणजे नगरविकास खात्याचा निधी दुसºया ठिकाणी खर्च करता येत नाही.तालुका स्तरावर पाच कोटी रूपयांपेक्षा अधिकची टेंडर पक्रिया राबविता येत नाही असे नियम असतांनाही येथे पंधरा कोटी रूपयाचे टेंडर कसे काय काढण्यात आले ?असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.भंडारा नगर परिषदेवर भाजपची सत्ता आली त्यावेळी नगर परिषदेची तिजोरी पुर्णपणे रिकामी होती. मात्र आमदार भोंडेकर आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावुन बदनामी करीत आहेत.

आ.भोंडेकर हे भंडाराचे आमदार आहेत त्यांनीसुध्दा भंडारा शहराच्या विकासाला हातभार लावण्याकरीता सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा असतांना ते आमच्यावर खोटेनाटे आरोप लावण्याचे काम करतात ते आम्ही खपवुन घेणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. भंडारा नगर परिषदेवर जवळपास चार वर्षे प्रशासक होते त्या काळातमोठया प्रमाणात भंडारा शहरात चुकीच्या पध्दतीने कामे करण्यात आली.त्या सर्व कामांची चौकशी करण्यात येणार आहे.भंडारा शहरातील विकासाची बहुतांश कामे आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली त्यापैकी अनेक कामांची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत आहे त्या कामांचीसुध्दा चौकशी करून सदर कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आ.भोंडेकर हे भाजप-शिवसेनाराष्टÑवादी मित्र पक्षाचे महायुतीचे आमदार आहेत. असे असतांनाही ते भाजप नेते आ.परिणय फुके यांच्याबद्दल बोलतांना अर्वाच्च भाषेचा वापर करतात.

आ.भोंडेकर यांना भाजपबद्दल काही तक्रारी असल्यास त्यांनी त्याबाबत वरिष्ठांशी बोलुन वाद मिटवावा.आ.भोंडेकर हे आ.फुके यांना परजिल्ह्यातील असल्याचे संबोधतात. मात्र आ.फुके हे मागील१५ वर्षापासुन भंडारा जिल्ह्याचे रहीवाशी असुन एक सक्रिय नेता म्हणुन त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. आ.भोंडेकर हे आमचे नेते आ.फुके यांच्याबद्दल अपशब्द बोलने टाळावे अन्यथा भाजपचे पदाकिारी-कार्यकर्ते आ.भोंडेकर यांच्या घरासमोर आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला भंडारा नगराध्यक्ष मधुरा मदनकर,नगर परिषद उपाध्यक्ष चंद्रकला भोपे,भाजप जि.प.गटनेता विनोद बांते,जिल्हा नियोजन समिती सदस्य जैकी रावलानी, भाजप शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर,न.प.सभापती सचिन घनमारे, नगरसेवक भगवान बावनकर, नगरसेिवका वैशाली ब्राम्हणकर, नगरसेिवका सौ.चड्डा, नगरसेवक नितीन गायधने, नगरसेवक कैलाश भुरे,भाजपयुवा मोर्चा अध्यक्ष अक्षय भिवगडे आदि उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *