मंगेश बानेवार/भंडारा पत्रिका दिघोरी मोठी : ई-पिक पाहणी प्रक्रियेतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करून शेतकºयांना स्वत:च्या मोबाईलवरून पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच अतिक्रमणधारक पट्टेधारकांच्या शेतजमिनींच्या पीक नोंदणीसाठी स्वतंत्र आॅनलाइन सुविधा द्यावी, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे लाखांदूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी केली आहे. यासंदभार्तील निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना देण्यात आले. शासनाकडून शेतकºयांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी ई-पिक पाहणी प्रक्रिया राबविण्यात येत असली, तरी अनेक ठिकाणी वेळेअभावी, मनुष्यबळाच्या मर्यादा तसेच तांत्रिक अडचणींमुळे पीक पाहणी निर्धारित कालावधीत व अचूकपणे पूर्ण होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे डीएससी पीक पाहणी अॅपमध्ये ‘माझी ईपिक पाहणी (शेतकरी स्वत:)’ ही सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकºयांना स्वत:च्या शेतातील पिकांची नोंद मोबाईलद्वारे करता आल्यास प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. करीता तांत्रिक अथवा प्रशासकीय कारणांमुळे पीक पाहणी न झाल्यास केवळ त्या कारणावरून शेतकºयांना पीक विमा, आधारभूत धान खरेदी, अनुदान, नुकसानभरपाई किंवा इतर शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवू नये. त्यासाठी पयार्यी पीक पडताळणीची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. पीक पाहणी, शेतकºयांचा शेतजमिनीवरील हक्क, उपजीविकाआणि विविध शासकीय योजनांच्या लाभांशी संबंधित असल्याने या मागण्यांवर शासनस्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, शेतकरी कार्यकर्ते रामलाल सूर्यवंशी, मंगेश बानेवार, मच्छिंद्र मावळे, हेमराज डोकरे, राजेश सुरकर, सौरंभ देशमुख, संजय दाणी, सोपान भेंडारकर, रतन रामटेके, सुनील येरणे, सुनील साळवे, तुळशीराम नेवारे, यांच्यासह लाखांदूर, साकोली व लाखनी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.