पक्ष मजबुतीकरिता महिलांचा सक्रिय सहभाग वाढवा : खा. राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आज गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीची विस्तार बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे खासदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, जिल्हाध्यक्षा सौ.रजनी गिºहेपुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्षा रजनीताई गिºहेपुंजे यांचे अभिनंदन करून महिला संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यात. बैठकीत मार्गदर्शन करतांना खासदार राजेंद्र जैन म्हणाले की, महिला संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत भाष्य केले. स्थानिक पातळीवर संघटन अधिक मजबूत करणे, जास्तीत जास्त महिलांशी संवाद साधणे, पक्षामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे, बूथ कमिट्यांमध्ये उत्साही महिला कार्यकर्त्यांचा समावेश करणे, तसेच पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविणे या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

पुढे बोलतांना खा. राजेंद्र जैन म्हणाले की, आपण सर्वांचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाची विचारसरणी आणि ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून आपण सर्व संघटितपणे पक्षाचे कार्य करतो. महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, स्वावलंबन, आत्मनिर्भर व सक्षमी करणाकरिता महायुती सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. विकासवादी धोरणांना महिला पदाधिकाºयांनी संघटनेच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी केतन तुरकर, राजु एन.जैन, माधुरी नासरे, डाँ अविनाश काशिवार, डी.यु. रहांगडाले, यशवंत गणवीर, सुनील पटले, मंजुषा बारसागडे, सुधाताई रहांगडाले, अश्विनीताई पटले, प्रियाताई हरिनखेडे, निर्मला मिश्रा, ममता बैस, कीर्ती पटले, सरला चिखलोंढे, विशाखा टेम्भूरणे, कविता रहांगडाले, दीपा काशिवार, धनिसा कटरे, पुष्पमाला बडोले, क्रिष्णा कोरे, दुर्गा चौहान, शीला चौहान, पायल भेलावे, शर्मिला पाल, जया धावळे, पारबताबाई चांदेवार, पुजा उपवंशी, शर्मिला टेम्भूर्णीकर, सोनाली ब्राह्मणकर, हर्षल राऊत, श्रद्धा रहांगडाले, अनिता तुरकर, कल्पना खोटेले, बबिता मेश्राम, ममिता लांजेवार, आम्रपाली डोंगरवार, पुष्पलता दृगकर, ज्योत्सना शहारे, शीला ब्राह्मणकर, सीमा शेंडे सहित मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *