शालेय विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एम. श्री जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूरच्या

वंश खेडकरची राज्यस्तरीय पात्रता चाचणीसाठी निवड !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

लाखांदूर : पी. एम. श्री जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर येथील १९ वर्षाखालील मुलांच्या बॅडमिंटन संघाने शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जिल्हास्तरा पासून विभागस्तरापर्यंत उत्कृष्ट खेळचे प्रदर्शन करणाऱ्या संघातील वंश खेडकर याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता चाचणीत यश संपादन केले आहे.

भंडारा येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत शाळेच्या संघाने दमदार कामगिरी करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आणि विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर वर्धा येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत संघाने उत्कृष्ट खेळचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीत पर्यंत मजल मारली. मात्र, उपांत्य फेरीत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कौशल्यापूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता चाचणी देण्याची संधी मिळाली. या चाचणीत वंश उमेराव खेडकर याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. वंशच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॅडमिंटन संघातील खेळाडूंमध्ये वंश उमेराव खेडकर, पुष्यम आशिष टेंभुर्णे, ज्ञानेश विजय लामकाने, ईशान माधवराव बनकर व अथर्व अरविंद राऊत यांनी खेळाडूंची मेहनत, जिद्द, चिकाटी, शिस्त आणि साधिक भावना महत्त्वपूर्ण ठरली. शाळेचे प्राचार्य जगेश्वर सिडाम, क्रीडा शिक्षिका कु. प्रणाली डोंगरे आणि विषय शिक्षक पराग सोनवणे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. तसेच शाळेतील शिक्षक शेंडे मॅडम, मेश्राम मॅडम, वाळवते सर, नशीता इनकने, कुंजली आकरे, मंगेश जराते, लंजे मॅडम, करपते सर व सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

वंश खेडकर याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी प्राचार्य, शिक्षकवृंद आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *