अपुºया एसटी बसफेºयांमुळे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : धापेवाडा मार्गावरील अपुºया एसटी बसफेºयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ४) सकाळी धापेवाडा येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल तीन तास वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली, तर तिरोडा एसटी आगाराच्या उत्पन्नालाही फटका बसला. आगार प्रशासनाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून बससेवा नियमित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. धापेवाडा मार्गावरून गोंदिया येथील शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तिरोडा आगारातून या मार्गावर सकाळी सहा वाजल्यापासून सुमारे १५ बसफेºया होत असल्या तरी गर्दीच्या वेळेत बस पूर्णपणे भरून जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. परिणामी त्यांना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते आणि शाळा-महाविद्यालयात उशिरा पोहोचावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

यापूर्वीही अनेकदा बसफेºया वाढविण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता धापेवाडा येथे रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली. “बसफेºया वाढवा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा” अशा घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.आंदोलनाची माहिती मिळताच तिरोडा आगार प्रमुख संजना पटले व बसस्थानक प्रमुख कुणाल आगार यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी मान्य करत बससेवा अधिक नियमित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच उपलब्ध बसेसचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांची गैरसोय कमी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने सुमारे तीन तासांनंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र, या आंदोलनामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांचा नियोजित प्रवास खोळंबला, तर एसटीच्या अनेक फेºयांवर परिणाम होऊन तिरोडा आगाराच्या उत्पन्नालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. बसफेºया नियमित व पुरेशा प्रमाणात सुरू न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Den svenska casinomarknaden har vuxit snabbt de senaste åren och nya jämförelsesajter gör det enklare för spelare att hitta rätt plattform. En relativt färsk aktör på nischen är Slotspice, där man kan läsa om bonusvillkor, spelutbud och olika betalningsmetoder innan man väljer var man vill spela. Många entusiaster uppskattar att kunna ta del av ärliga recensioner av spelautomater, live casino-bord och jackpottar innan de sätter igång, och sajten samlar dessutom information om aktuella kampanjer och lojalitetsprogram från licensierade operatörer.