केक कापण्याऐवजी वृद्धाश्रम्यात पोहोचले प्रोफेसर

डॉ. बबन मेश्राम यांचा अनोखा सामाजिक उपक्रम; वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श पायंडा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : समता नगर फेज २ येथील सामाजिक कार्यकर्ते व इंटरनॅशनल लायन्स क्लब चे झोन पर्सन प्रो. डॉ. बबन मेश्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संत सेनाजी महाराज सांस्कृतिक व कला मंडळ लाखनी द्वारा संचालित रेंगेपार कोहळी गावातील मानव कल्याण वृद्धाश्रम्यातील ज्येष्ठ नागरिकांना गरम कपड़े आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपन्यात आली.

आजकाल वाढदिवसावर मोठा खर्च करून बॅनरबाजी आणि पाटर्या करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत. लायन्स क्लब भंडारा ब्राससिटि, सुल्भा बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते प्रो. डॉ. बबन मेश्राम यांनी आपला वाढदिवस समाजातील वंचित घटकांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत लाखनी तालुक्यातील मानव कल्याण वृद्धाश्रम येथील वृद्ध माता-पितांना येणारे हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दर्जेदार गरम कपडे, ब्लॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्य संचालक गुलाब लांजेवार, लायन्स क्लब भंडारा ब्राससिटि चे अध्यक्ष ॲड. मोगेश खोब्रागडे, क्लब चे सचिव व सुल्भा बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे अध्यक्षा डॉ. सुल्भा मेश्राम, केंबिनेट सदस्य ॲड. धनराज खोब्रागडे, लायन सदस्य श्रीमती खोब्रागडे, स्विटी खोब्रागडे, प्रा. चंदन मोटघरे डॉ. प्रांजल मेश्राम, प्रज्ज्वल मेश्राम, सौ. विमल लांजेवार, रवी लांजेवार, जोत्सना लांजेवार, विमल लांजेवार यांच्या उपस्थित कपड़े हाती पडताच लाभार्थी पार्वती बावणे, सविता महाजन, रामनाथ रामटेके, माणिक रामटेके, रेखा पडोले, यादव राऊत, देवराव कांबळी, भगवान सिडाम, कालिदास देशमुख, मिरा लोदासे, जयवंता नंदुरकर, सुशिला निर्वाण वृद्ध आजोबा-आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. वृद्धाश्रम्यानंतर भंडारा शहरात तान्हा पोळ्याचे औचित्य साधून सहकार नगर, राजीव गांधी चौक, समतानगर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, कंपस बॉक्सचा समावेश होता. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे हसू उमटले. या प्रसंगी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, “वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट आहे.

जेष्ठांचे आशीर्वाद आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे मनाला खूप समाधान मिळाले.”या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, प्रो. बबन मेश्राम यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल सहकार नगर येथे लायन्स क्लब पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पी. डी वांदिले व शोभनाताई वांदिले परीवार यांनी शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सम्मानित केले. तसेच डॉ. मेश्राम यांच्यावर मित्रपरिवार आणि सामाजिक संस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *