नराधमाला फाशी द्या, अन्यथा महायुतीच्या सर्व मंत्र्यांना जिल्ह्यात ‘गावबंदी’!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात एका अवघ्या साडेतीन वर्षांच्या अबोध चिमुकलीवर झालेल्या नराधमाच्या अमानुष लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झाला आहे. या विकृत घटनेविरोधात ‘जनसंघर्ष समिती, भंडारा जिल्हा’ च्या वतीने पोलीस अधीक्षकांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. नराधमाला तातडीने फाशीची शिक्षा न झाल्यास आणि महिला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना भंडारा जिल्ह्यात ‘गावबंदी’ करण्यात येईल, तसेच थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट व प्रखर इशारा समितीने दिला आहे. निवेदनाद्वारे जनसंघर्ष समितीने पोलिसांच्या आणि शासनाच्या ढिम्म कारभारावर जोरदार प्रहार केला.

शासनाकडून महिला सुरक्षेचे कितीही मोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात शाळकरी मुली, विद्यार्थिनी व महिलांना दररोज छेडछाड, गुंडगिरी आणि टवाळखोरीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानके, शाळा-महाविद्यालयांचे परिसर आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या आसपास रोडरोमिओ मोबाईलवरून फोटो/व्हिडिओ काढून त्रास देण्याचे प्रकार वाढले असून, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला गेला आहे. करीता नराधमावर पोक्सो (ढडउरड) अंतर्गत कडक कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व योग्य विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करून त्याला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी. बसस्थानक, शाळा, महाविद्यालये व निर्जन स्थळांवर टवाळखोरी करणाºयांवर कडक कारवाई करण्यासाठी २४ तास पोलीस गस्त सुरू करावी. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत ‘शून्य विलंब व शून्य हलगर्जी’ या तत्त्वावर काम करण्याचे कठोर आदेश पोलीस यंत्रणेला द्यावेत.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, शाळा, उद्याने व स्वच्छतागृहांच्या परिसरात हायडेफिनिशन सीसीटीव्ही (उउळश्) कॅमेरे बसवून सुरक्षारक्षक तैनात करावेत. या अमानुष घटनेतील आरोपीला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवले नाही, तर जनसंघर्ष समिती गप्प बसणार नाही. यापुढील काळात महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याला भंडारा जिल्ह्यात पाय ठेवू दिला जाणार नाही; सर्वांना ‘गावबंदी’ केली जाईल. गरज पडल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर व मुंबई येथील घरासमोर तीव्र ठिय्या आंदोलन केले जाईल.यामुळे उद्भवणाºया परिस्थितीला शासन व प्रशासनच जबाबदार राहील! असा थेट इशारा बालू ठवकर, प्रवीण उदापुरे, सतीश सार्वे, बाबा पाटेकर, रवी तिरपुडे, प्रभाकर सार्वे, रवि लोंदासे, अनिल भुरे, मोनू गोस्वामी, अजय डोंगरे, हंसराज गजभिये, आणि जनसंघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *