भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला कारवाईचा मोर्चा आता शाळा, अंगणवाडी आणि वसतिगृहांच्या दिशेला वळवला आहे. शाळा, अंगणवाडी आणि वसतिगृह येथे विना परवाना अन्न पुरवता येणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. शाळांमध्ये जेवण पुरवणाºयांना ऋररक चे नियम पाळणे बंधनकारक असेल, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत मोठी घोषणा केली. “शाळांमधील कॅन्टीन, मध्याह्न भोजन केंद्र, वसतिगृह, वसतिगृहातील स्वयंपाकघर आणि सर्व वैध अन्न पुरवठादार यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे काय शाळेत जे कॅन्टीन असेल किंवा शाळांमध्ये जेअन्न पुरवठा करतात किंवा अंगणावाडीत अन्न पुरवणारे कंत्राटदार असतील ते ऋररक चे परवाना असणारेच असू शकतात. नसतील तर त्यांना परवाना असणारे अन्न पुरवठादार रुजू करावे लागतील”, असंतुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.