आंबाडी येथे अचानक रानडुकराचा हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिल्ली अंबाडी :- तालुक्यातील अंबाडी येथील दिलखुष चहा सेंटर येथे दुपारच्या सुमारास सात आठ कर्मचारी चहा नाष्टया करिता बसले असताना विदर्भ पाटबंधारे गोसे सिंचन कॉलनीतून एक रानटी डुक्कर आला आणि लोकांवर हल्ला चढवाला, अचानाक झालेल्या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले असून काय झाले थोडा वेळ कुणालाच कळले नाही.यावेळी विदर्भ पाटबंधारे येथील दोन तीन कर्मचारी हे सुद्धा किरकोळ जखमी झाले असून भीतीच्या वातावरणात आहे. नुकतेच शेतावरून काम करून घराकडे जात असताना पाणी पिण्यासाठी चहाच्या दुकानात गेले.स्थानिक शेतकरी शालिक राजीराम भुरे ६० वर्षे यांना जबर मार लागला असून पाय आणि लघवीची जागा चिरत नेली. त्यामुळे पायाला टाके लावण्यात आले असून जखम खूप मोठी आहे.

स्थानिक तसेच घरच्या लोकांनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून तात्काळ सरकारी दवाखान्यात पाच दिवस उपचार घेतले. गरीब परिस्थिती आहे. जखमी झाल्यामुळे बेड रेस्ट सांगितली असून यापुढे मेहनतीचे, व कष्टाची कामे करू नये, असा सल्ला दिला, त्यामुळे आता घरचा करता पुरुष कायमचा घरी बसला.त्यामुळे घरातील कुटुंब चे खर्च कसे भागणार असा चिंता वाढली असून वन विभागाने कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे अंबाडी हे गाव अत्यंत वर्दळीचेअसून मोठी लोकवासाहत आहे. ज्या दिवशी रान डुकराचा हल्ला झाला त्यादिवशी आठवडी बाजार होते, मात्र बाजारात जास्त गर्दी नसल्याने अनेकजण थोडक्यात बचावले अन्यथा मोठी चेंगराचेंगरी झाली असती असे प्रत्यक्षदर्शी रामलाल श्रावण भुरे यांनी सांगितले. दिवसा ढवळ्या रानटी जनावरे थेट गावात राजरोषपणे नागरिकावर हल्ला करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाच्या कार्यवाहीवार प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *