उत्सव काळात ‘डॉल्बी, डीजे’ वापरावर निर्बंध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्ह्यात डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस आदी मल्टीस्पीकर), प्लाज्मा साऊंड सिस्टीम, प्रीमियम साऊंड सिस्टीम तसेच तत्सम ध्वनीप्रणालींच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात दहीहंडी, पोळा, तान्हापोळा, ताजीयाबाबा छब्बीसवी, गणेशोत्सव, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव मंडळे तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रणालीचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण, नागरिकांना होणारा त्रास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सावन कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्सवांच्या काळात डॉल्बी साऊंड, प्लाज्मा साऊंड, प्रीमियम साऊंड सिस्टीम व तत्सम प्रणाली वाहनांवर वापरण्यास तसेच अशा प्रणालीसाठी वाहनांमध्ये बदल (टङ्म्िरा८) करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ही अधिसूचना दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४.०० वाजल्यापासून दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत लागू राहील. मात्र, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मध्ये नमूद असलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाºया साऊंड सिस्टीमना या अधिसूचनेतून सूट राहील. अधिसूचनेतील कोणत्याही शतीर्चे उल्लंघन करणाºयांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *