भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राजकारणात पदे येतात आणि जातात परंतु पदावर असतांना जनतेची ंकामे करणाºयांनाच जनता आठवणीत ठेवते. बाळासाहेबांनी सांगीतल्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे समिकरण असणे गरजेचे आहे मात्र आजची परिस्थिती काय आहे? असा प्रश्न महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज उपस्थित केला. ते भंडारा जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करतांना बोलत होते. भंडारा शहरातील बालाजी सभागृहात आयोजित या मेळाव्याला भंडारा विधानसभेचे आ. नरेंद्र भोंडेकर, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, भंडारा गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विलास चावरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले कि, मेळाव्याला उपस्थित असलेले कार्यकर्ते ज्या प्रमाणे भगवा दुपट्टा आपल्या खांद्यावर घेऊन बसले आहेत त्यांनी सोबत असणाºयाच्या खांद्यावर या दुपट्टयाची जबाबदारी कशी देता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे तरच शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष होऊ शकेल. आज भंडारा जिल्हाधिकाºयांशी झालेल्या बैठकीत भंडारा जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आवश्यक ते निर्देश देण्यात आले असुन जिल्ह्याच्या विकासाकरीता निधी कमी पडु देणार नाही येणाºया काळात जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळणार असल्याचे असे मंत्री सामंत यांनी सांगीतले. इतिहासात महिलांकरिता सर्वाधिक निर्णय घेणारे हे शिंदे साहेबच होते.
भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्पाच्या जागेवर स्टील प्लांट लावण्यात येईल असेही मंत्री सामंत म्हणाले. यावेळी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, आपण सन २००९ पासून राजकारणात आणि पक्षात अनेक चढ-उतार बघीतले परंतु भगव्याची साथ सोडली नाही. २०१९ मध्ये आमदार असतांनाच निवडणुकी दरम्यान अनेक आॅफर आल्या परंतु मी शिवसेनेतच राहिलो. विरोधकांनी शिवसेना संपली असे म्हणायला सुरूवात केली होती परंतु आपण ती निवडणूक अपक्ष जिंकलो व दाखवून दिले कि शिवसेना ही अस्तित्वात होती, आहे आणि पुढेही राहणार. आता शिवसेना पक्ष हा फक्त भंडारा विधासभापुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण जिल्ह्यात याचे अस्तित्व निर्माण झाले आहे. पाण्यातील मासोळी ज्या प्रमाणे पाण्याशिवाय राहू शकत नाही तेच नाते आता आमचे शिवसेना पक्षाशी झाले आहे.
शिवसेना पक्ष क्रमांक एक चा पक्ष कसा करता येईल हेच आमचे एकमेव ध्येय असल्याचे आम. भोंडेकर यांनी सांगीतले. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नव्याने परिसीमन न झाल्यास येणाºया लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष आपला दावा करेल व आपला उमेदवारही दिला जाईल अशीघोषणाही आमदार भोंडेकर यांनी यावेळी केली. या वेळी मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, उप जिल्हा प्रमुख विकास मदनकर, उप जिल्हा प्रमुख विजय काटेखाये, उप जिल्हा प्रमुख किशोर पंचभाई, उप जिल्हा प्रमुख नरेश उचीबगले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख साविताताई तुरकर, युवा सेना प्रमुख अंकुश वंजारी, नितीन सेलोकर, माजी जिला परिषद उपाध्यक्ष दीपक गजभिये, न.प. गटनेता राजू धुर्वे, जिल्हा संघटक नितीन धकाते, भंडारा तालुका प्रमुख संजय आकरे, दत्तू जगनाडे, पवनी तालुका प्रमुख जितेश इखार, शहर प्रमुख नरेंद्र बुरडे व रोशन काटेखाये, माजी नगराध्यक्ष बाबू बागडे, मुकेश थोटे, नागपूर जिल्हा प्रमुख सुरज गोजे, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, भंडारा महिला तालुका प्रमुख विद्या मेहर सह साकोली आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याचे संचालन व आभार प्रदर्शन पवनी शहर प्रमुख अनिल धकाते यांनी केले.