गुदमा-प्रतापबाग रेल्वे मागार्साठी भूसंपादनावर शेतकºयांचा संताप; पाचपट मोबदल्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गुदमा-प्रतापबाग नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होताच कटंगी कला, नागरा, हल्बीटोला आणि सावरी परिसरातील शेतकरी व जमीनमालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनाकडून अवघ्या दोन दिवसांत प्राप्त झालेल्या मोबदला पत्रांमध्ये जमिनीला अत्यल्प दर निश्चित करण्यात आल्याचा आरोप प्रभावित शेतकरी व मालमत्ताधारकांनी केला आहे. बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी मोबदला देऊन जमीन संपादित करण्याचा प्रयत्न होत असल्याने संतप्त शेतकºयांनी याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, २३ आॅगस्ट रोजी कटंगी कला ग्रामपंचायत सभागृहात प्रभावित शेतकरी व जमीनमालकांची आपत्कालीन बैठक घेण्यात आली. बैठकीत भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या मोबदल्याच्या दरावरून उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाजारातील प्रत्यक्ष दराचाविचार न करता कमी मोबदला देणे अन्यायकारक असल्याचे सांगत, योग्य व समाधानकारक मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नसल्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *