नेत्रदान पंधरवड्याच्या प्रारंभी नेत्रबुब्बूळ संकलन उपक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नेत्रदान पंधरवडा निमित्त उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे नेत्रदान जनजागृती व नेत्रबुब्बूळ संकलन उपक्रमास उत्स्फूर्त प्रारंभ करण्यात आला. नेत्रदान पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी एका दिवंगत व्यक्तीच्या नेत्रबुब्बूळाचे यशस्वी संकलन करण्यात आले. सुशीलाबाई चिंतनवर देशमुख वय ८० वर्षे रा. शिवाजीनगर, तुमसर असे नेत्रबुब्बूळ दान करणाºयाचे नाव आहे. नेत्रबुब्बूळ संकलनाची कार्यवाही उपजिल्हा रुग्णालय, तुमसरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रचिकित्सक अधिकारी निखिल मानवतकर यांच्या हस्ते नियमानुसार व वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करून पार पाडण्यात आली. या कार्यवाहीसाठी आवश्यक असणारे नेत्रदान साहित्य व इतर वैद्यकीय साधनसामग्री अभिषेक आडे, औषध निर्माण अधिकारी यांनी उपलब्ध करून दिली. तसेच या उपक्रमाच्या वेळी निकेत नैताम, दंत आरोग्यक अधिकारी यांची उपस्थिती होती. नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसºयाच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, समाजामध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती वाढविणे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. उपजिल्हा रुग्णालय, तुमसरच्या वतीने नेत्रदान पंधरवड्यादरम्यान अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *